Home पिंपरी-चिंचवड सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा –...

सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त पिं. चिं. म. न.पा तथा नोडल अधिकारी स्वीप उपक्रम

0

पिंपरी : दि. ९ ऑक्टोबर  २०१९
(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- : सक्षम  लोकशाहीसाठी  प्रत्येकाने मतदानाचा हक्क  बजवावा असे आवाहन करत  सर्वांनी  येत्या विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला  बहुसंख्येने  मतदान करावे असे  आवाहन पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेचे  सहाय्यक आयुक्त  तथा स्वीप  उपक्रमाचे नोडल अधिकारी  अण्णा बोदडे यांनी  केले. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात सर्वांनी सहभागी व्हायला हवे आणि मतदानासाठी सज्ज व्हायला हवे असेही  बोदडे  यावेळी  म्हणाले. 

चिंचवड येथील  यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे  पुणे  जिल्हा निवडणूक  अधिकारी  कार्यालय, २०५ चिंचवड  विधानसभा  मतदार संघ यांच्या  सहकार्याने  स्वीप  उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात  आलेल्या  मतदार  जनजागृती अभियानात मार्गदर्शन करताना  ते  बोलत  होते. 

तर  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  करताना  पिंपरी-चिंचवड  महानगर पालिकेचे  प्रफुल्ल  पुराणिक यांनी सांगितले की,मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे  आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने  स्विप कार्यक्रम राबविला जातो. असे सांगत  व्ही व्ही पॅट मशीनच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर  माहिती सांगितली. तसेच यावेळी व्ही व्ही पॅट मशीनच्या माहितीबाबतचा  तसेच  मतदानाचे  महत्व याबाबतचे  निवडणूक आयोगाने  तयार केलेले   माहितीपट दाखविण्यात  आले. 

याप्रसंगी  कार्यक्रमाला संस्थचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र  सबनीस, यशस्वी  एकेडमी  फॉर स्किल्सच्या शैक्षणिक  विभाग प्रमुख डॉ.सुनिता  पाटील  यांच्यासह  संस्थेचे  सर्व  प्राध्यापक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने  उपस्थित  होते. यावेळी  ओंकार  वाघ या विद्यार्थ्याने मतदारांनी  घेण्याच्या  शपथेचे वाचन  केले. 

प्रा. सारंग दाणी  यांनी  आकाश  घोगरे  या विद्यार्थ्यासोबत या कार्य्रक्रमाच्या सामाजिक माध्यमांवरील  प्रसिद्धीची (सोशल मीडिया) जबाबदारी  सांभाळली.    

तर मतदानाच्या जनजागृतीबाबत तयार  करण्यात  आलेले  पोस्टर (फलक) धरून घोषणा देण्यात  आल्या. यावेळी  कार्यक्रमाला पवन  शर्मा, संदीप  गेजगे,योगेश  निकम, अभिजित चव्हाण, राजेंद्र  शेळके, प्रा.महेश  महांकाळ डॉ. पुष्पराज वाघ, अदिती चिपळूणकर आदींनी  विशेष  सहकार्य केले.   कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  योगेश  रांगणेकर यांनी  केले. 

Previous articleथेरगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकही बुथ लावू देणार नाही – शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे
Next articleचोऱ्यामाऱ्या करून इथपर्यंत आलात, भोसरी मतदारसंघात “व्हिजनटपरी-टपरी” राबविले; दत्ता सानेंची महेश लांडगे यांच्यावर घणाघाती टिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − 11 =