Home ताज्या बातम्या मित्र पक्षांचा सन्मान करत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करण्याचा निर्धार

मित्र पक्षांचा सन्मान करत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करण्याचा निर्धार

0

आकुर्डी,दि.३०सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मित्र पक्षांचा सन्मान करत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करण्याचा निर्धार आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एक दिलाने एकत्र येऊन उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मित्र पक्षांचा सन्मान राखत शहरातील तीन ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत आज घेण्यात आला आकुर्डी येथील शिवसेना भवन येथे आज सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली खासदार श्रीरंग बारणे आमदार अॅड.गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुठे, शहर संघटिका अॅड उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधुकर बाबर,यांच्यासह सेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना पदाधिकारी महिला व शिवसैनिक उपस्थित होत. यावेळी खासदार बारणे म्हणाले शिवसेनेकडे पिंपरी मतदारसंघ वाटेला आलेला आहे त्यामुळे पिंपरी सह चिंचवड भोसरी या मतदारसंघातील आपले महायुतीचे तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे आदेश त्यांनी दिले आमदार चाबुकस्वार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची ग्वाही यावेळी उपस्थित सर्वांनी दिली.

Previous articleपिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा संधी;उमेदवारी जाहीर
Next articleवंचित बहुजन आघाडीला पुणे जिल्ह्यात बसणार मोठा फटका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − ten =