Home ताज्या बातम्या राज्यातील गड – किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णया विरोधात पिंपरीत झाले अंदोलन

राज्यातील गड – किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णया विरोधात पिंपरीत झाले अंदोलन

0

पिंपरी,दि.७ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी-गिरीश वाघमारे):-भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील गड – किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधात व हा घेतलेला निर्णय तात्काळ घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी पक्ष -सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करून भाजपा सेना युती सरकारचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने मुर्दाबाद घोषणा देऊन उपस्थित महिलांच्या वतीने त्यांच्या फोटोस जोडो मारो आंदोलन करून मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाच्या प्रतीची सार्वजनिक होळी करण्यात आली. यावेळी बोलताना मानव कांबळे म्हणाले की, या जातीयवादी सरकारने गड – किल्ले हेरिटेज हॉटेल व लग्नसमारंभासाठीच्या कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्याचा घेतलेला निर्णय शिवस्वराज्याच्या विरोधात केलेला द्रोह असून इथली रयत हा निर्णय कदापि मान्य करणार नसुन हा निर्णय त्यांना तात्काळ मागे घ्यावाच लागेल. व या पुढच्या निवडणूकीत असल्या छत्रपती शिवारायांच्या विचारा विरोधातील जुलमी सरकारला घरी बसवल्याशिवाय जनता शांत बसणार नसल्याचे प्रतिपादन केले. तसेच आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी मागील ५ वर्षात भाजपा सेना युतीच्या भ्रष्टाचारी सरकारचा पर्दापाश केला.असल्या जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या सरकारला पाय ऊतार होण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेले मराठा महासंघा चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे सचिन चिखले, समाजवादी पार्टीचे रफिक कुरेशी, लोकजनशक्ति पार्टीचे धुराजी शिंदे, शेकापचे नाना फुगे, आपचे प्रकाश पठारे, एमआयएमचे धम्मराज साळवे, राष्ट्रवादीचे विशाल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड, छावा संघटनेचे धनाजी येळकर, संभाजी ब्रिगेडचे विशाल तुळवे, अपना वतनचे सिद्दीक शेख व नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीष वाघमारे यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले. यावेळी सतिश काळे, नीरज कडू,लहुजी लांडगे, रशिद सय्यद, जीवन बोराडे,सतिश कदम, राजेंद्र देवकर,छाया देसले, आश्विनी बांगर उपस्थित होत्या.

Previous articleबचत गटांच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार: प्रधानमंञी मोदी
Next articleवंचित आघाडीची पहिली यादी जो पर्यंत जाहीर होत नाही, तो पर्यंत काँग्रेससाठी १४४ जागांचा प्रस्ताव कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 11 =