यवतमाळ:(१जुलै २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जिल्ह्यातील कृषि महाविद्यालय कोंघारा चे रावे विद्यार्थी यांनी वंसतराव नाईक जयंती व कृषि दिन साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोटुरवार मैडम, तर प्रमुख पाहुने रॉय मैडम, राजडकर मैडम, अंगनवाडी सेविका गौरकार मैडम हे उपस्थित होते. दैनंदिन जिवनात वृक्षाचे महत्व काय हे प्रास्ताविक मध्ये नागेश इद्नुरवार याने सांगीतले. कंपनी गाड्या मोटार मुळे प्रदुषण होत आहे तर याकरीता आढा घासण्यासाठी आज झाडे लावने गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सुञसंचालन अनीकेत ताकसांडे, तर आभार प्रदर्शन कृपाल कामटकर याने केले. कार्यक्रमानंतर वृक्षारोपन करून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुरज बाजन्लावार, अनंत अनव्हाने, लोकनाथ उराडे, तेजस कमलापुरे, गौरव बरदिया, ईश्वर वाढबुद्धे, योगेश सावके यांनी फार मेहनत घेतली.