Home ताज्या बातम्या गोयल गंगा फौंडेशनचा पुढाकाराने मासिक पाळीबाबतच्या समस्या संदर्भातील जागरुकता कार्यक्रमाचे केले होते...

गोयल गंगा फौंडेशनचा पुढाकाराने मासिक पाळीबाबतच्या समस्या संदर्भातील जागरुकता कार्यक्रमाचे केले होते आयोजन

0

पुणे-दि.१६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- मासिक पाळीबाबतच्या समस्यांसंदर्भातील जागरुकता निर्माण करण्यासाठी गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मधील हाऊसकीपिंग, कॅंटीन आणि शाळेच्या बस मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या जागृतीसाठी गोयल गंगा फौंडेशनच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हमजोली फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सानिया सिद्दिकी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनच्याच्या विश्वस्त सोनू गुप्ता, गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मुख्याध्यापिका भारती भागवाणी,तसेच इतर महिला शिक्षकही उपस्थित होते.
मासिक पाळीच्या काळात घेण्याची काळजी,पॅड बाबतची स्वच्छता आणि त्याची विल्हेवाट, बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी पॅडचा वापर कमी गुणवत्ता असलेल्या पॅडच्या वापरामुळे जंतुसंसर्ग,खाज येणे यांसारखे आजार, मासिक पाळी वेदनारहित कशी काढावी याच्या युक्त्या, पाळीच्या संदर्भातील पाळले जाणाऱ्या चुकीच्या समजुती, मेनोपॉजच्या काळात शारीरिक आणि मानसिक काळजी कशी घेतली जावी यासारख्या विविध विषयांवर डॉ.सानिया सिद्दिकी यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
त्या पुढे म्हणाल्या कि, पॅड ऐवजी घरगुती कापडांचे पॅडही वापरले जाऊ शकतात. कापड स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळत घालावे. कापडावरील जंतू उन्हाने मरतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हामध्ये कापड घालणे शक्य नसल्यास या कापडांना इस्त्री केली तरी चालू शकते. त्याबरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कापडाचा स्वत:चा वेगळा संच असावा. इतर कोणाचेही पाळीचे कापड वापरू नये.
पाळीबाबतचे समज गैरसमज आणि नैतिकदृष्या अपवित्रतेचा समज तोडून टाकण्याबाबतचा दृष्टीकोन मुलींमध्ये,पालकांमध्ये आणि समाजातील अन्य घटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला पाहिजे .भविष्य जन्माला घालणाऱ्या आजच्या वर्तमानाला तितक्याच पवित्रतेने स्वीकारून त्यांचा सन्मान करूयात. असे मत सोनू गुप्ता यांनी व्यक्त केले.

Previous articleमहापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
Next articleलोकसभेची एकही जागा न देता,विधानसभेच्या गाजरावर मिञपक्षाची समजुत काढण्यात मुख्यमंञी फडणवीस यशस्वी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × four =