पिंपरी-(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदीरात करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे. यानिमित्त मंगळवारी (दि. 19 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजता श्रींना उष्णोदक अभिषेक व अभ्यंगस्नान, श्रींच्या उत्सव मुर्तीचे पुजन व मंगलस्नान सोहळा सकाळी 7 वाजता कलश पुजन, 11 वाजता तुळजाई व अशोका महिला भजनी मंडळ यांचे भजन, दुपारी 3.30 वाजता श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक गजानन महाराज मंदीर ते चिंचवड गाव परिसरातून काढण्यात येणार आहे यानंतर महाआरती; बुधवार (दि. 20 फेब्रवारी) ते सोमवार (दि. 25 फेब्रुवारी) पर्यंत रोज पहाटे 5.30 वाजता श्रींच्या मुर्तीस अभिषेक, सकाळी 6 ते 7 विष्णु सहस्त्रनाम, 9 ते 10 श्रीसूक्त पठण, सकाळी 10 वाजता नित्याचे श्री गजानन विजय ग्रंथ वाचन, दुपारी व सायंकाळी विविध भजनी मंडळांच्या वतीने भजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच बुधवारी (दि. 20 फेब्रवारी) व गुरुवारी (दि. 21 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता ह.भ.प. केशव शिवडेकर (गोवा); शुक्रवारी (दि. 22 फेब्रवारी) सायंकाळी 6 वाजता डॉ. सजंय उपाध्ये (पुणे); शनिवारी (दि. 23 फेब्रुवारी) ह.भ.प. प्रा. विलास गरवारे (सातारा); रविवार (दि. 24 फेब्रुवारी) पहाटे 5.30 पासून श्री गजानन विजय ग्रथाचे अखंड चोविस तास पारायण, सकाळी 7.30 वाजता श्री सत्यनारायण महापुजा; सोमवारी (दि. 25 फेब्रवारी) सकाळी 9 वाजता ह.भ.प. अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) 11.45 वाजता श्रींची प्रगटवेळ व गजर, दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 5.30 वाजता वेदमूर्ती बाळासाहेब पंढरपुरे व ब्रम्हवृंद यांचे मंत्र जागर, 7 वाजता श्रींची आरती, 7.30 ते रात्री 10.30 पर्यंत स्वरनंदा प्रस्तुत ‘झाली फुले स्वरांची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अमेय जोग, संदीप उबाळे, स्वरदा गोडबोले, शरयु दाते व निर्माता संजय गंभीर सादर करणार आहेत. रात्री 10.30 वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.