Home ताज्या बातम्या *भाजपाच्या हातात जेव्हा पासुन सत्ता आली आहे,तेव्हा पासुन देशात अराजकता माजली आहे-...

*भाजपाच्या हातात जेव्हा पासुन सत्ता आली आहे,तेव्हा पासुन देशात अराजकता माजली आहे- अॅड.सुरेश माने*

0

पिंपरी दि.३ फेब्रुवारी(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पिपंरी-चिंचवडच्या वतीने शहरात राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती साविञीमाई फुले,माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जंयती निम्मित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर पिपंरी येथे अभिवादन सभा घेण्यात आली,या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अॅड सुरेशजी माने सर होते,कार्यक्रामाचे प्रास्ताविक भाषणात शहर अध्यक्ष संजीवन कांबळे म्हणाले रिंग रोड च्या नावा खाली लोकांची घर उध्वस्त केली जात आहे,जबरदस्तीने घरकुल ला गोपीनाथ मुंडे नाव देण्याच कारस्थान भाजप सरकार करत आहेत,एस आर ए संदर्भात राजकिय पुढारी व बिल्डर हे संगमताने जनतेची फसवणुक करत आहेत,पिंपरी चिंचवड महानगर पालिका पदाधिकारी व नगरसेवक,आमदार,खासदार यांचे जनते कडे दुर्लक्ष असुन स्वताच्या स्वार्था साठी काम करत आहेत.प्रमुख वक्ते सर्वजीत बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड शहारातील सरकार हे दिशाभुल करत असुन भाजप सरकार हे फसव्याच सरकार आहे,
झोपड्डपट्टी घोळ,व पाञ अपाञ याद्याचा घोळ अशा अनेक कारणानी लोकांना वेठीस धरले आहे.रेल्वे लगतच्या झोपडपट्याचे अजुन पुर्नवसन केलेले नाही,पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस भेडसावत आहे,मुलभुत सोईसुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे,या सरकारने आंधळ्याच आणि बहिर्‍याच सोंग घेतले आहे,अस सरकार उलथुन टाकण्याची वेळ आली आहे, कार्यक्रामाचे अध्यक्ष अॅड सुरेशजी माने सर(संथापक/राष्र्टिय अध्यक्ष-बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) मार्गदर्शन करताना म्हटले, *भाजपाच्या हातात जेव्हा पासुन सत्ता आली आहे,तेव्हा पासुन देशात अराजकता माजली आहे*
जाती जातीमध्ये तणाव तेढ निर्माण करुन वाद वाढले आहे.व त्याचा परिणाम जाळपोळ तसेच खुन,हत्या,चोरी दंगल घडविण्याचे प्रमाण वाढले आहे,भाजप सरकारने दिलेले सर्व आश्वासन फेल ठरली आहेत नोटबंदीचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगायला लागत आहे,बेरोजगारांना आजतागायत नोकर्‍या मिळल्या नाहीत.कट्टर पंथीय संघटनांकडे हत्यारे सापडतात तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे,भिमा कोरेगाव प्रकराणात भिडे सारख्या मनुवाद्याला गुन्हे मागे घेऊन निर्दोष असल्याचा दाखला देत आहे,मोदी आणि फडणविस सरकार अशा अनेक कारस्थानाने बरबटलेले सरकार आहे,अर्थनिती कोलमडली असुन प्रत्येक व्यक्तीवर कमीतकमी ६५ हजार रुपायचे कर्ज करुन ठेवले आहे,या सरकारने आत्ताच्य् बजेट मध्ये फक्त बजेट एक वर्षाच आणि स्वप्न अनेक वर्षाच दाखवले आहेत,शेतकर्‍याना ५०० रु महा पेन्शन न देता ५०००रु महा पेन्शन दिले पाहिजे आशा सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने पुढे आले पाहिजे,२०१९ला भाजपा सरकारला धडा शिकवला पाहिजे योग्य माणसाला निवडुन दिले पाहिजे,या वेळी महासचिव-गजानन शिरसाठ,ओबीसी आणि आदिवासी आघाडिचे अध्यक्ष अशोक धनगावकर,प्रदेश महासचिव मिलींद अहिरे,अॅड.सुमित साबळे, प्रदेश सदस्य सौ अनिता सावळे,सामाजिक कार्यकर्त्या गंगाताई धेंडे,संगिता शहा,मुमताज नवाब शेख,अाशा बाबा कांबळे, सामाजिक नेते गोपाळ मोरे,दशरथ शिंदे,बाळासाहेब चंदनशिवे,दिपक शिकोञे, उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुञ संचालन धिरज बगाडे,ईश्वर कांबळे,नितीन कांबेळे तर अभार प्रदर्शन नितीन कसबे यांनी केले,कार्यक्रमाचे संयोजन-विजय ओहोळ,शिवाजी लोदें,जयंत चिंचोलीकर,राम बनसोडे,आबा चव्हाण,श्रीराम लोमटे,आकाश कांबळे बाळासाहेब भालेराव,इद्रीस शेख,बाबुराव मिरजे,विशाल शिरोळे,राम ठोके,पंकज झेंडे,उदय बागुल,सर्वज्ञा भंडारी,आतुल पगारे,वेंकटेश कुराडे,सुनिल कुठ्ठी,मावळ,चिंचवड,शिरुर लोक सभा पदाधिकारी व पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी यांनी केले

Previous articleपिंपरी कॅम्पमधील वसाहतींचे विस्तृत सर्वेक्षण करण्याचे आदेश -आमदार ॲड. चाबुकस्वार
Next articleदेहुरोड उड्डाण पुलाच्या उदघाटनाची घाई का केली गेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × five =