Home ताज्या बातम्या सरकारचे कामगारांबाबतचे धोरणाच्या निषेधार्थ-सचिन साठे

सरकारचे कामगारांबाबतचे धोरणाच्या निषेधार्थ-सचिन साठे

0

पिंपरी(दि.18)प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी:- रोजगाराच्या नावाखाली डान्सबारला परवानगी तर, ठेकेदारांकडे काबाडकष्ट करीत आयुष्यभर कंत्राटी पध्दतीने काम करणा-या कामगारांची पिळवणूक, हे सरकारचे कामगारांबाबतचे धोरण निषेधार्थ आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध ठेकेदारांकडे कंत्राटी पध्दतीने काम करणा-या सर्व कर्मचा-यांना कायम कर्मचा-यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात अन्यथा शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
संघटीत व असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटीत व असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, घरेलू महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा शितल कोतवाल, रेखा पाठक, नवनाथ डेंगळे, नरेंद्र बनसोडे, मनोहर वाघमारे, रमजान आत्तार, बबन शिरसाट, किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, तारीक महंमद सैय्यद आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागातील ठेकेदारांकडे काम करणा-या वाहन चालक व कचरावेचक कर्मचा-यांना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, प्राव्हिडंट फंड, आरोग्य सुविधा, सुरक्षा साधने द्यावीत. तसेच या सुविधा न देणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि ठेकेदारांबरोबर संगनमत करुन कष्टकरी कामगारांचे आर्थिक शोषण करणा-या अधिका-यांवर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई करावी अशी मागणी संघटीत व असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केली. यावेळी ठेकेदार व अधिका-यांविरोधात उपस्थितांनी घोषणा दिल्या.

Previous articleदेहुरोड उड्डाण पुलाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- राहुल अलकोडें
Next articleनिगडीत अंगावरील दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे महागडे बिस्किट देतो सांगून महिलेला ३२ हजारांचा गंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 4 =