देहुरोड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-
ऐतिहासिक धम्मभुमी,देहुरोड बुद्ध विहाराच्या ६४व्या वर्धापन दिन दिनांक २५/१२/२०१८ रोजी धम्मभुमी देहुरोड या ठिकाणी संपन्न होत असुन हा कार्यक्रम बुद्ध विहार ट्रस्ट,देहुरोड(रजि.न.:ए-११९७/पुणे)अध्यक्ष-अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर,भारतीय बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने साजरा केला जात आहे.सकाळी ८.००वा ध्वजारोहन,धम्मदिप प्रज्वलन व बुद्ध वंदना,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅन्टोमेंन्ट हाॅस्पीटल देहुरोड येथील पुतळ्यास पुष्प हार अर्पण केला जाईल मावळचा राजा मिलींद शिंदे,राहुल शिंदे, दिलीप सरोदे व पुणे जिल्हा कला विकास संघ यांचा गायनाचा कार्यक्रम होईल,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान तळेगाव बंगला स्मारक ते ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड पर्यंत श्रद्धेय भिमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित भव्य मिरवणुक व जाहीर सभा होईल व ते मार्गदर्शन करतील,या वेळी वक्ते अंकुश कानडी,सुमेध भोसले(ट्रस्टी),संजय ओव्हाळ(ट्रस्टी) बोलतील,या वेळी सभेचे अध्यक्ष अॅड.गुलाबराव चोपडे(कार्यध्यक्ष-ट्रस्टी),स्वागताध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे(शहराध्यक्ष पिं.चिं.शहर भा.रि.प),सहकार्याध्यक्ष रोहन गायकवाड(ट्रस्टी),भारतीय बोद्ध महासभाचे पदाधिकारी,समता सैनिक दलाचे जवान भारिप बहुजन महासंघाचे पि.चि शहर,पुणे जिल्हा,मावळ चे पदाधिकारी,व देहुरोड पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक-अॅड.अशोक रुपवते(सचिव ट्रस्टी)हे तर सुञसंचालन माऊली सोनवणे(माजी अध्यक्ष मा.भारिप),व आभार प्रदर्शन सुनिलभाऊ वसंत कडलक हे करतील अशी माहिती बुद्ध विहार ट्रस्टी संजय ओव्हाळ यांनी प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले
Home ताज्या बातम्या *बुद्ध विहार ट्रस्ट,देहुरोड आयोजीत ऐतिहासिक धम्मभुमी,देहुरोड बुद्धविहाराच्या ६४ वा वर्धापन दिन*