Home ताज्या बातम्या नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रोजगार मेळावा

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रोजगार मेळावा

0

पिंपरी(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी).4डिसेंबर 2018:-
नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. 8 डिसेंबर) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालय येथे सकाळी साडेनऊ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार असल्याची माहिती संयोजक नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेविका शीतल काटे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, कुणाल थोपटे, विकास शिंदे, सागर कोकणे, सुनील काटे आदी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात संगणक, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, औषध, टेक्स्टाईल, बांधकाम, उत्पादन, विपणन, विक्री, सेवा, केमिकल, पेट्रो केमिकल, फायनान्स, प्रिटींग टेक्नॉलॉजी, बँका, तारांकीत हॉटेल, हॉस्पीटल, हाऊस किपींग, सुरक्षा, ईव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव डॉ संदीप कदम भूषविणार आहेत, यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, युवा नेते पार्थ अजित पवार, पिंपरी चिंचवड मनपा विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेवक मंगला कदम, अपर्णा डोके, योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्राचार्य श्रीकृष्ण माळी, डॉ. बाळकृष्ण झावरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, ज्येष्ठ नगरसेविका उषा वाघेरे, झामाताई बारणे, उषा काळे, प्रज्ञा खानोलकर, स्वाती काटे, सुलक्षणा धर, गीता मंचरकर, निकीता कदम, निता पाडाळे, नगरसेवक हिरानंद (डब्बू) आसवानी, राजू मिसाळ, शाम लांडे, रोहित काटे, संतोष कोकणे, विनोद नढे, मयुर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, समिर मासुळकर, राजू बनसोडे, राहुल भोसले, संजय वाबळे, पंकज भालेकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, कैलास थोपटे, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र साळुंखे, गणेश भोंडवे, विलास नांदगुडे, सतिश दरेकर, हरिभाऊ तिकोणे, निलेश पांढारकर, मनोज खानोलकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, सुमनताई नेटके, सुषमा तनपुरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, पीसीएमटीचे माजी सभापती दिलीप बालवडकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणा-या इयत्ता दहावी पासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांनी www.nanakate.org या संकेत स्थळावर आपले नाव नोंदवावे किंवा 9860001112 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Previous articleसावित्रीबाई फुले जयंती निमित्य 3 आणि 4 जानेवारी 2019 रोजी 1942 महिला परिषद चे आयोजन
Next articleमाणसातला माणूस ओळखणे आणि सतत मदत करणारे व्यक्तीमत्व नितीन गवळी- गोरख गवळीसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + seventeen =