Home पिंपरी-चिंचवड स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वीं जयंती...

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि पहिल्या एकट्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या ३४वीं पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाने वाहिली आदरांजली !!!

0

पिंपरी चिंचवड(प्रजेचा विकास न्युज)-दि. ३१/१०/२०१८ रोजी पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीनेस्वतंत्र भारताचे पहिले गृह मंत्री लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि पहिल्या एकट्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या ३४ वीं पुण्यतिथी निमित्त अजमेरा कॉलनी कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्वप्रथम जेष्ठ काँग्रेसी अ‍ॅड. जयराम शिंदे आणि मा. नगरसेविका निगारताई बारस्कर ह्यांनी इंदिराजी आणि वल्लभभाई पटेलजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल ,अ‍ॅड. सरिता जामनिक आणि नगर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष उत्तम शिंदे ह्यांनी पुष्प अर्पण करून नमन केले. सर्वानी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली.
ह्या वेळी सर्वानी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत सदैव पर्यावरणाची रक्षा करण्याची प्रतिज्ञा केली. आणि ह्या दिपावलीत ध्वनी आणि वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठीचे सर्वस्वीपरीने कार्य करण्याचे निश्चित केले.
ह्या प्रसंगी जयराम शिंदे, निगारताई बारस्कर, अशोक मंगल, सरिता जामनिक, उत्तम शिंदे, अशोक काळभोर, दिलीप पांडारकर आपल्या चिरंजीव सह,आयुष मंगल, उमेश बनसोडे, संदेश नवले, आबा खराडे, आनंद सोंडकर, श्वेता मंगल,राजेश नायर, बजरंग ओहोळ, मिताली चक्रवर्ति, एस टी कांबळे, नाझिया बारस्कर, जयश्री काननाइके उपस्थित होते

Previous articleन्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी
Next articleरुग्ण हक्क कायदा लागू करण्यासाठीची चळवळ बळकट करा – अॅड. वैशाली चांदणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − eight =