पिंपरी-(सतीश कदम) चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून त्यांना जीवनावश्य वस्तूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेची कामे करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याबाबत महापालीका प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे, पावसाळा सुरू झाल्याने उपाययोजना करण्यात यावी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे हातमोजे, गमबुट, मास्क,रेनकोट, गणवेश,साबण, अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी,श्वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे, त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील तीन-महिने कामगारांना वाईट परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.पालीकेत चार हजार पाचशे कंत्राटी सफाई कामगार आहेत शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्यां या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता केवळ पगारावरच त्यांची बोळवण केली जाते, झोपडपट्टी, रस्ते, पदपथ, यांची ते सफाई करीत असतात सतत घाणीत काम करीत असल्याने यातील अनेकांना टीबीची लागण होते त्यांच्या आरोग्यासाठीच्या पालीकेच्या अनेक योजना केवळ कागदावरच आहेत त्यांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचत नाही
अनेक कामगार सद्या स्वाईनफ्ल्यू व टीबी या सारख्या आजारांवर उपचार घेत आहेत त्यांना आरोग्य सेवा मिळण्यातही अडचणी येत आहेत सफाई कामगारांना आरोग्य सुविधा पुरवणे हे कंत्राटदाराचे काम नसून ती जबाबदारी प्रशासनाची आहे, मात्र प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे अनेक सफाई कामगार आजारांनी ग्रासले आहेत, पालीकेकडून तुटपुंजे पैसे दिले जात असल्याने ते कामगारांना रेनकोट, गणवेश, गमबुट, आदी सुविधा देऊ शकत नाहीत त्यामुळे महापालीकेकडून सफाई कामगारांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत दिल्या जावेत त्यांनी अोळखपत्र दाखवल्यावर त्यांच्याकडून केस पेपरचेही पैसे घेऊ नये याशिवाय कामगारांना गणवेश, साबण, टॉवेल, मास्क, तसेच पावळ्यात गमबुट, रेनकोट देणे पालीकेला बंधनकारक आहे मात्र या सुविधा त्यांना मिळत नाहीत आजही अनेक सफाई कामगार भर पावसातच कोणत्याही सुविधा मिळत नसतांनाही हाताने घाण साफ करीत आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या या सफाई कामगारांचे आरोग्य मात्र वाऱ्यावर आहे त्यामुळे या तक्रारीचे दखल घेऊन सफाई कामगारांना तात्काळ सुरक्षेची आवश्यक साधने देण्यात यावीत, अन्यथा संघटनेच्या वतीने महापालीकेचा तीव्र निषेध करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा सतीश कदम यांनी दिले आहे. जीवनावश्य वस्तूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.