तळेगांव – केंद्रीय राखीव सुरक्षा दल येथे दि. २४/०८/२०१८ रोजी रक्षाबंधनानिमित्त अंबी तळेगांव येथील डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वतीने नाविन्यपूर्ण सोहळा आयोजित केला होता. या मध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांना विद्यार्थींनी व स्टाफ यांनी राख्या बांधल्या. या सोहळ्याला केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे प्रमुख मान्यवर डी. आई. जी. जीसी पुणे बी. के. टोपो, डी. आई. जी. परमहंस, डी. आई. जी. रेंज अरुनेंद्र प्रताप सिंग हे उपस्थित होते. व तसेच डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अंबी येथील डायरेक्टर डॉ. वर्षा बिहाडे, प्रो. शलाखा कुलकर्णी, प्रो. रुपाली सोलसकर, प्रो. अनुश्री जांभूळकर, प्रो. श्वेता कुमारी, प्रो. सायली करंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमा बरोबरीनेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ने केरळ पुरग्रस्थांना ही सढळ हाताने मदत केली.