Home ताज्या बातम्या *काकासाहेब शिंदेंची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या !* *युवानेते अमित बच्छाव...

*काकासाहेब शिंदेंची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या !* *युवानेते अमित बच्छाव यांचा आरोप*

0

पिंपरी चिंचवड: औरंगाबाद येथे आंदोलनकर्ता काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन स्वतःला संपवून घेतले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढायचा प्रयत्न केला नाही. मराठा आरक्षणाबाबत कोणतीही सकारात्मक भुमिका न घेता उलट आंदोलकांना डिवचण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे याच नैराश्येतून काकासाहेब शिंदें यांनी पाण्यात उडी घेत आत्महत्या केली.त्यामुळे हि आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या आहे.असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देत सत्ताधा-यांनी पिडीत कुटूंबियांना मदत जाहिर करुन कुटूंबातील एका व्यक्तिला सरकारी नोकरी देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत मराठा समाजावर गंभीर आरोप लावले होते. त्यामुळे सकल मराठा समाजात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र मुख्यमंत्री महोदय उद्घाटन/भुमिपूजन करण्यात व्यस्त आहेत.भाजप सरकार आंदोलकांना विचारत न घेता त्यांच्या मागण्या समजून न घेता उलट हुकूमशाही पद्धतीने वागत असल्यामुळे आज मराठा तरुण गमावला गेला आहे. त्यामुळे हि हत्या सरकार पुरस्कृत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तात्काळ मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,व आंदोलनकर्ता काकासाहेब शिंदेंच्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. संपूर्ण राज्यभर मागील चार-पाच दिवसांपासून आंदोलन वाढलेलं आहे. वातावरण चिघळण्या अगोदर सरकारने यावर तोडगा काढणे गरजेचे होते.परंतू तसे न करता सरकारने तटस्थ भुमिका घेत संभ्रामावस्था निर्माण करून आंदोलन चिघळविण्याचे काम केले आहे. राज्यभरात चालू असलेल्या आंदोलकांच्या धरपकडीचे भाजपला गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील.आणखी किती आंदोलकांना पोलीस अटक करणार आहेत ? महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत पालटत असून अनेक गटांत विभागलेला मराठा तरूण पुन्हा एकजुटीने उभा रहात आहे. त्या भीतीतूनच सरकारने पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड चालू केली आहे.यामागे राजकीय षडयंत्र आहे.या दुर्दैवी घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, कारण शांततेत लाखोंचे मोर्चे काढल्यानंतर सुद्धा झोपेचं सोंग घेतलेल्या या निर्दयी सरकारला अजुनही जाग आलेली नाही.हे दुर्दैवच म्हणावे लागेल.शांततापुर्वक लोकशाही मार्गाने आत्तापर्यंतच्या आंदोलनांची दखल न घेतली गेल्याने आत्ता आंदोलकांच्या सिमेचा बांध तुटला आहे.मराठा आंदोलक आक्रमक होतायेत याची जाण सरकारला असून देखील सरकारकडून मुळ मुद्दयावर जाणिवपुर्वक कानाडोळा करण्यात येत आहे.त्यामुळे माझ्या सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की, संयम बाळगा व जीव धोक्यात घालू नका.कारण लढ्यासाठी एक-एक जीव तितकाच महत्वाचा आहे.असे बच्छाव यांनी म्हटले आहे.

Previous article*मुख्यमंत्री साहेब,शहरात येताना विकास आणावा,गाजर नको!*-अमित बच्छाव
Next article*विठूनामाच्या गजरात किड्स वर्ल्ड शाळेची वृक्ष दिंडी विकासनगर,किवळे मध्ये*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 2 =