पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील विवीध विकासकामांचे उद्धाटन तथा भुमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री शहरात येत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शहरात येताना विकास आणावा,कारण जनता गाजराला वैतागली आहे.अशी उपरोधिक टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचवार्षिक निवडणूकीत भाजपकडून पिंपरी चिंचवड शहरातील विवीध प्रलंबित समस्या संदर्भात आश्वासनांची खैरात करण्यात आली होती.आश्वासनांचे गाजर दाखवित भाजप सत्तेत आली.परंतू आजतागायत दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्यात सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत.शहरातील स्थगीत घरकुल-झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प,रिंगरोडचा मुद्दा,वाढती गुन्हेगारी,बेकायदा बांधकामे,शास्तीकर माफी,२४ तास पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांत शहरवासीयांचा अपेभाभंग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात मंजूर तथा सुरू झालेली कामे शहरात दिसून येत आहेत.भाजपच्या भुलथापांमध्ये येऊन शहरातील जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून भाजपकडे जनतेने सत्ता दिली आहे.त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवल्या जात होत्या. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले आहे.मुख्यमंत्री शहरात येऊन केवळ उद्घाटनांचा सपाटा लावत आहेत.मुळात मात्र विकासकामे प्रलंबितच आहेत.त्यामुळे भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यास अकार्यक्षम ठरली आहे.आश्वासनांची गाजरं दाखवीत भाजपने शहर वासियांची घोर निराशा केली आहे.असे बच्छाव यांनी म्हटले आहे.