पिंपरी-(इम्रान तांबोळी)सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या “वनश्री” या पुरस्काराचे प्रथम मानकरी डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस, आंबी मधील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांनी स्वयं प्रेरणेने “कामायनी” या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कामायनी ही संस्था तळेगाव येथे असून 18 ते 30 या वयोगटातील दिव्यांग मुले येथे शिक्षण घेतात. या मुलांना वृक्षांचे महत्व पटवून सांगत विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांना वृक्ष लागवड करण्यात मदत केली. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यातून डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्यांनी वृक्ष आणि समाज यांच्या मधील संबंध फक्त वृक्ष लावूनच नाही तर त्यांचे संवर्धन करून जपावेत असा संदेश दिला. कार्यक्रमास उद्योजक सुनील ढोरे उपस्थित होते, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पवार आणि श्री. सुनील ढोरे यांनी प्रथम वृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर कामायनी संस्थेचे प्रमुख दिलीप भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.डी वाय पाटील टेक्निकल कॅपस चे अध्यक्ष डाॅ विजय पाटील व डायरेक्टर डाॅ रमेश वस्सपनावर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक श्री. बी. एस. गायकवाड आणि उपप्राचार्य डाॅ.प्रकाश पाटील तसेच सर्व विभागप्रमुख डाॅ.शैलेश चन्नापट्टना,डाॅ.मिनिनाथ निघोट,डाॅ.अनुपकुमार बोंगाळे,संजय बढे ,विठ्ठल वाघ,प्रशांत काठोळे,विकास मापारी, समरजीत पोवळकर, तृप्ती फुटाणे कार्यक्रम अधिकारी इम्रान तांबोळी ,शिक्षकवृंद आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, आंबी च्या विद्यार्थ्यांकडून “कामायनी” दिव्यांग शाळेमध्ये...