पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब-क्षेत्रीय कार्यालयात मार्फत महाराष्ट्र शासन प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन व हाताळणी, प्लॅस्टीक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री व वापर बंदी मोहिम राबविण्यात आली. श्री.संदिप खोत, ब-क्षेत्रीय अधिकारी व श्री.कुंडलिक दरवडे, सहा.आरोग्याधिकारी ब क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मध्ये श्री.के.बी.पारोल, मुख्य आरोग्य निरीक्षक व श्री.वसंत सरोदे , आरोग्य निरीक्षक तसेच श्री. संतोष दराडे व संतोष कांबळे या दोन सहका-यांच्या पथका मार्फत दि. ०४/०६/२०१८ रोजी १) पोर्णिमा स्वीट्स, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी २) भवानी स्वीट्स, गुरुद्वारा बालाजी चौक यांचेकडून अंदाजे ०३ किलो वजन असलेल्या पातळ प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त केल्या असून व्यावसायिकांकडून प्रत्येकी र.रू.५,०००/- असे एकुण र.रू.१०,०००/- दंड वसुल करण्यात आला आहे.
सही/-
क्षेत्रीय अधिकारी
ब क्षेत्रिय कार्यालय
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप :- ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत सर्व व्यावसायिकांना प्लॉस्टीक कॅरीबॅग वापर करु नये असे आवाहन करण्यात येत आहे.