धम्मचक्र बुद्ध विहार,शाहुनगर येथे जेष्ठ पोर्णिमे निमित्त रोजच्या बुद्ध वंदने सोबत भन्ते विमल किर्ती यांचे प्रवचन झाले.त्यावेळी त्यांनी जागतीक बुद्ध त्वा कडे लक्ष वेधले बुद्ध हे जन्माने नाहि,तर कर्माने असतो.मग तो कोण्या धर्माचा असो त्याने माणुसकी म्हणजे मनुष्य म्हणुन मनुष्याच्या उत्कर्षाला रुजवत असेल तर त्याने बुद्धत्व कबुल केले आहे. आपण भारतीयानी जन्मानी बुद्ध आहोत असे मानले आहे पण आपण सर्वांनी बुद्ध आचरणात आणला तर जगातील बोद्ध राष्र्ट भारतातील बौद्धांना मानतील मदत करतील,या वेळी धम्मभुषण सुरेश कसबे सर,एस.के.गणवीर सर,सखाराम इंगवले,गोकुळ गायकवाड,विकास कडलक,रामदास इंगळे,श्रीमंत जाधव,राजेंद्र वाघमारे,धम्मदिप लांडगे,सिद्धार्थ फाले,मनीषाताई सुरेश कसबे,सुशीला इंगवले,रुपाली वानखेडे,अनिता इंगळे,रंगारी ताई,रोशनी गजभिये, व अन्य उपासक उपासिका उपस्थित होते.