Home ताज्या बातम्या पालघर निवडणुकीत गावित यांनाच मतदान करा- रामदास अाठवले

पालघर निवडणुकीत गावित यांनाच मतदान करा- रामदास अाठवले

0

सर्वसामान्यांसाठी काम करतानाच संविधानाचाही मान राखणारे सरकार

सत्ता स्थापनेच्या चौथ्या वर्षपुर्तीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन


गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी काम करतानाच संविधानाचाही मान राखणाऱ्या मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहिर अभिनंदनही केले.


‘सबका साथ, सबका का विकास’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने चार वर्षे पुर्ण केली असून या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीची उजळणी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. गेली चार वर्षे फक्त सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केल्याने २०१९ मध्येही मोदी सरकारला पर्याय नसल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात पहिल्यांदाच लागू करत कररचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. देशात सध्या तब्बल साडे सहा लाख कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत. महिलांना विनातारण कर्ज देण्याची योजना प्रधानमंत्री मोदींनी सुरू केली. या शिवाय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा धाडसी निर्णयही या सरकारने घेतला. अनेक बोगस कंपन्या बंद केल्याच, शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री मोदींचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराची एकही मोठी घटना घडली नाही, त्यामुळेच गोरगरिबांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी सरकारला पार्याय नसल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, या सरकारने ग्रामीण विद्युतीकरण योजना यशस्वीपणे राबवत संपुर्ण देशातील एकही गाव वीजपुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. शिवाय सौभाग्य अनुदानित एलपीजी योजना, आणि गरीबांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनाही प्रभावीपणे राबविली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, जन औषधी योजना, ग्रामीण सडक योजना, जलद पासपोर्टसेवा, आणि नवसंकल्पीत उद्योगांना चालना देण्यासाठीच्या स्टार्ट अप योजनेचेही त्यांनी कौतुक केले.

या शिवाय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. या संविधानाबद्दल तसेच संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत या सरकारच्या मनात आदर असल्याचे सांगत मा. आठवले म्हणाले की, संविधानाच्या गौरवासाठी या सरकारने संसदेचे दोन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घेतले. तसेच २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार आहे.त्यामुळे मोदी सरकारकडून संविधानाला कोणताच धोका नसून केवळ राजकारणासाठी विरोधक संविधानाला धोका असल्याचा खोडसाळ आरोप करत आहेत. तसेच इंदू मील येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, नवी दिल्लीतील २६ अलीपुर रोड येथील स्मारक आणि लंडन येथील स्मारकाच्या कामालाही या सरकारने गती दिल्याचेही ते म्हणाले.

पालघर निवडणुकीत गावित यांनाच मतदान करा- रामदास अाठवले
पालघर पोटनिवडणुकीतील भाजपच्या प्रचारात सहभागी होत मा. आठवले यांनी काही जाहिर सभा घेतल्या. या सभेदरम्यानही त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील तसेच राज्यातील सरकारचे कौतुक केले. सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सरकारचे हात बळकट करण्यासाठी पालघरमधील विजय गरजचा असून मतदानाच्या दिवशी फक्त भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनाच मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Previous articleदिव्यांगांना अर्थसहाय्य ही मदत नसून भाजपवरील विश्वासाची परतफेड आहे – अर्थराज्यमंत्री शुक्ला
Next articleबारा बलुतेदार महासंघाचा भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 1 =