Home मनोरंजन फडणवीस सरकारची ३६ हजार नोकर भरतीसाठी नवी अट

फडणवीस सरकारची ३६ हजार नोकर भरतीसाठी नवी अट

376
0
Prajecha Vikas

मुंबई: दोन वर्षात तब्बल ७२ हजार सरकारी पदे फडणवीस सरकार भरणार असून यावर्षी त्यापैकी ३६ हजार तर पुढील वर्षी ३६ हजार पदे भरण्यात येतील. पण सरकारने या भरतीप्रक्रियेत नवी अट घातली आहे. ही पदे भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर भरली जातील. त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.

सध्या शिक्षण सेवकांसाठी जसे तीन वर्षे मानधनाची अट आहे, ती आता ५ वर्षे असेल. तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची ३६ हजार पदे पहिली पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. ती त्यानंतर नियमित केली जातील. तसा उल्लेख राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात आहे.

राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत आणि त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Previous articleपोलिसांनी शिवसेनेच्या ‘हिंदू शक्ती’ मोर्चास परवानगी नाकारली
Next articleधनंजय मुंडेंना शिरूर नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 12 =